| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जुलै २०२४
आपल्या भन्नाट आयडियानी जनसामान्यांच्या चर्चेत असलेले नितीन गडकरी नेहमीच जनतेमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. आताही त्यांनी असे काही स्टेटमेंट दिले आहेत ज्यामुळे महाराष्ट्रवासियांचे लक्ष त्यांच्या या चर्चेकडे वेधले आहे. तुम्हाला लवकरच देशात 132 आसनी बस दिसू शकते. प्रवाशांच्या सोयीसाठी फ्लाइटप्रमाणे बसमध्येही एअर होस्टेस असतील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पायलट प्रकल्पाचा उल्लेख केला आहे.
"तुम्हाला लवकरच देशात 132 आसनी बस दिसू शकते. प्रवाशांच्या सोयीसाठी फ्लाइटप्रमाणे बसमध्येही एअर होस्टेस असतील." असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. एका खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले की, नागपुरात पायलट प्रोजेक्टवर काम सुरू आहे. पायलट प्रोजेक्टमध्ये 132 आसनी बसचा समावेश आहे. बसची जागा फ्लाइट सारखी असेल. तसेच, फ्लाइटप्रमाणे त्यात खाद्यपदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय बस होस्टेसची सुविधाही देण्यात येणार आहे. ही बस प्रदूषण न करणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतांवर धावणार आहे. त्याची राइड इतर बसेसच्या तुलनेत स्वस्त असेल, असेही गडकरी यांनी म्हटले आहे.
बसमध्ये काय-काय असणार ?
गडकरी म्हणाले, 'बसमध्ये वातानुकूलित, आरामदायी खुर्च्या आणि आसनांसमोर लॅपटॉप ठेवण्यासाठी जागा असावी, असे मी सुचवले आहे. प्रवाशांना फळे, पॅकबंद खाद्यपदार्थ आणि पेये पुरवणाऱ्या बस होस्टेसचीही सोय असावी.
नागपुरात होणार पायलट प्रोजेक्ट
एका खासगी टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले की, नागपुरात पायलट प्रोजेक्टवर काम सुरू आहे. पायलट प्रोजेक्टमध्ये 132 आसनी बसचा समावेश आहे. बसची जागा फ्लाइट सारखी असेल. तसेच, फ्लाइटप्रमाणे त्यात खाद्यपदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय बस होस्टेसची सुविधाही देण्यात येणार आहे. ही बस प्रदूषण न करणाऱ्या ऊर्जेच्या स्रोतांवर धावणार आहे. त्याची राइड इतर बसेसच्या तुलनेत स्वस्त असेल.
टाटासोबत काम सुरू
टाटासोबत पायलट प्रोजेक्टवर काम सुरू असल्याचंही गडकरींनी सांगितलं. त्यांनी सांगितले की, जेव्हा मी चेक रिपब्लिकला गेलो होतो तेव्हा तिथल्या तीन बसेस जोडून एक ट्रॉली बस बनवली होती. आमच्या प्रकल्पातील बसमध्ये 132 जागा असतील. ही बस रिंगरोडवर 49 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. 40 किमी नंतर बस स्टॉपवर थांबेल आणि नंतर 40 सेकंदात रिचार्ज करून पुढील 40 किमी प्रवास करेल. प्रवासाचा खर्च 35-40 रुपये प्रति किमी असेल.