yuva MAharashtra 'याने' केली आत्महत्या आणि जगभरात माजली खळबळ !

'याने' केली आत्महत्या आणि जगभरात माजली खळबळ !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जुलै २०२४
संपूर्ण जगभरात सध्या ए आय रोबोटची चर्चा सुरू आहे. कुठे हॉटेलमध्ये, कुठे इस्पितळात ते अगदी थेट शाळेमध्ये अवतरलेला ए आय रोबोट हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु सध्या आणखी एका कारणामुळे हा रोबोट चर्चेत आला असून कुठल्या एखाद्या कामगिरीमुळे नव्हे तर केलेल्या आत्महत्यामुळे !


सध्या जगभरात प्रत्येकालाच ताणतणाव जाणवतो. यात सर्वाधिक ताण आहे तो आपल्या व्यस्त जीवनाचा. सातत्यपूर्ण काम हा यातील महत्त्वाचा घटक आहे. दक्षिण कोरियातील एका रोबोट ने काम करत असताना पायऱ्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा रोबोट गुमी सिटी कौन्सिल मध्ये कार्यरत होता. सकाळी नऊ ते संध्याकाळी चार हा सतत कामात व्यस्त असायचा. आणि याच कामाच्या ताणामुळे या रोबोटने आत्महत्या केल्याचा संशोधकांचा अंदाज आहे.

आता संशोधकांची एक टीम गुमी सिटी कौन्सिलच्या दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावरील पायऱ्यावर विखुरलेल्या रोबोटच्या अवयवांचा अभ्यास करणार आहे. यावरून केवळ मानवालाच नव्हे तर यांत्रिक मानवाला हे विश्रांतीची गरज असल्याचे संशोधकांचे मत आहे.