| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ जुलै २०२४
नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. ज्याचा फटका महाआघाडीतील राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला बसला. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या आमदारांची नावे जाहीर करून त्यांच्यावर हाय कमांड कारवाई करेल असे सांगितले होते.
आता पटवले यांची कारवाईची घोषणा की नुसताच फार्स असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कारण पटवले यांनी कारवाईचे जाहीर केलेले 19 तारीख उलटून गेली. दिल्लीचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात येऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावाही घेऊन गेले. जाता जाता चेन्निथला यांनी या फुटीर आमदारावर कारवाईचे संकेतही देऊन गेले परंतु कारवाईबाबत कोणतीही हालचाल होताना मात्र दिसत नाही.
याबाबत आपले मत व्यक्त करताना राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले की, या फुटीर आमदारावर कारवाई करण्याची शक्यता धुसर असल्याचे सांगून, सांगितले की विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. जर कारवाई झाली तर हे आमदार निश्चितच महायुतीकडे जातील, ज्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बसू शकतो. 2022 मध्ये अशीच परिस्थिती उद्भवली होती. तेव्हाही क्रॉस वोटिंग होऊनही कारवाई टाळली गेली. कारण अवघ्या दहा दिवसातच महाआघाडीचे सरकार कोसळले होते. परंतु तेव्हाचे आणि आताचे परिस्थिती वेगळी आहे. आता काँग्रेसची ताकद वाढली आहे. मात्र तरीही कारवाई करण्याचा धोका काँग्रेसची हाय कमांड पत्करेल ही शक्यता नाही, असेही देसाई यांनी सांगितले आहे.