Sangli Samachar

The Janshakti News

राज्यात महाआघाडीची सत्ता येताच विधानसभेत पहिला प्रश्न वृत्तपत्र विक्रेते एजंटांच्या अडचणीबाबत - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
इलेक्ट्रॉनिक आणि मोबाईलच्या युगात वृत्तपत्रांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेता आणि समाज यांचे कायमच अतूट नाते राहणार आहे. वृत्तपत्र विक्रेता एजंट लाईनमन यांची तपश्चर्या मोठी आहे. कष्टकरी वर्गाबद्दल आपुलकीचे संस्कार मला वडील गुलाबराव यांनी दिले. म्हणून कायमच मला आपल्या कामाचा अभिमान व आदर वाटतो. 

शासनाने आपल्यासाठी वृत्तपत्र विक्रेता एजंट कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून भरीव निधी द्यावा व उतारवयात काम थांबल्यानंतर पेन्शन व सानुग्रह अनुदान दिले पाहिजे. मोफत वैद्यकीय सुविधा आणि मुलांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदत द्यावी. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता आल्यावर मी विधानसभेत पहिला आपला प्रश्न उपस्थित करुन न्याय मिळवून देण्यासाठी कटीबध्द आहे अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील यांनी दिली. पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता भवनमध्ये आयोजित वृत्तपत्र विक्रेता एजंट रेनकोट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वागत दत्तात्रय सरगर तर प्रास्ताविक सचिन चोपडे यांनी केले. मनोगत व्यक्त करताना विकास सुर्यवंशी म्हणाले की, पृथ्वीराज पाटील हे कायम वृत्तपत्र विक्रेता एजंटांना सहकार्य करतात. संजय कांबळे व मारुती नवलाई यांनी वृत्तपत्र विक्रेता एजंट म्हणून खूप कष्टमय जीवन जगतात. त्यांना रेनकोट देऊन पृथ्वीराज पाटील फौंडेशन व बाबांनी आपुलकी दाखवून दिली आहे.


आभार विशाल राशनकर तर सूत्रसंचालन सचिन चोपडे यांनी केले. यावेळी पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम, प्रा. एन. डी. बिरनाळे, आयुब निशाणदार, प्रशांत ऐवळे, सागर घोरपडे, सुरेश कांबळे, नागेश कोरे, कृष्णा जामदार, श्रीकांत दुधाळ, दिपक वाघमारे, बजरंग यमगर, प्रशांत साळुंखे, बाळासाहेब पोरे, जावेद शेख, देवानंद वसगडे व वृत्तपत्र विक्रेता एजंट लाईनमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.