| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० जुलै २०२४
ज्या शेरी नाल्याने जवळपास राजकारण्यांना खाद्य पुरवले, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकवून दिल्या, तो सांगलीकरांच्या आरोग्याचा मृत्युदूत बनून जगाच्या नकाशावर गेला. आज पर्यंत सातत्याने चर्चेत आणि आरोग्याशी खेळत कायम वाहता राहिला. मध्यंतरी तत्कालीन काँग्रेस सरकारने यावर तोडगा काढीत, शेरीनाल्याचे पाणी शुद्धीकरण करून शेतीला देण्याचा घाट घातला. परंतु यासाठी शेतकऱ्यांकडून मिळणा-या अत्यल्प प्रतिसादमुळे, यासाठी खर्च केलेले कोट्यावधी रुपये याच शरीराण्यातून कृष्णा नदीत मिसळले. तो प्रश्न आता कायमचा निकालात निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सांगली मिरज व कुपवाड महापालिकेत शुभम गुप्ता या लोकहितकारी आयुक्तांची नेमणूक झाली आहे. खुर्चीवर बसतात क्षणापासून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेऊन सांगलीकरांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. आता आता सांगलीकरांच्या आरोग्याचा हा कर्दनकाळ कायमचा काढण्यासाठी नव्याने 94 कोटींचा प्रकल्प तयार केला असून त्यानुसार अस्वच्छ पाणी एकत्रित करून ते शुद्धीकरणासह शेतीसाठी वापरण्याचे नियोजन केले आहे. जर शेतकऱ्याने प्रतिसाद दिला, तर ही योजना कार्यान्वित होऊन, सांगलीकरांचा काळ बनलेला प्रश्न कायमचा निकालात निघू शकतो. आता यात कितपत यश मिळते हे येणारा काळच ठरवेल.