yuva MAharashtra पूरबाधित नागरिकांसाठी आपत्ती काळात पुनर्वसनबाबत नियोजन पूर्ण !

पूरबाधित नागरिकांसाठी आपत्ती काळात पुनर्वसनबाबत नियोजन पूर्ण !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जुलै २०२४
सन २०१९ व २०२१ साली सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्राला कृष्णा नदीच्या अत्त्युच्च्य पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. या अनुभवानुसार सन २०२४ पावसाळा कालावधीला सामोरे जाण्यासाठी शुभम गुप्ता आयुक्त यांनी महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थाची कार्यप्रणाली तयार केली आहे. या कार्यप्रणालीचे पावसाळा पूर्व तयारी, पावसाळा कालावधीतील तयारी व पावसाळ्या नंतरची तयारी असे तीन भाग करण्यात आले आहेत व यानुसार उपाययोजना व विभागनिहाय अधिकारी, कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.


सन २०२४ च्या पावसाळा कालावधीत उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व सर्व यंत्रणा सज्ज असून यावर्षीही मदत, सुटका, पुनर्वसन यांत महानगरपालिका सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आढावा घेण्यात आला आहे , साधारणपणे 36 ठिकाणी महापालिकेच्या शाळेमध्ये निवारा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यासाठी नियंत्रण आणि समन्वयक नियुक्त केले आहेत. आज आयुक्त शुभम गुप्ता व अति. आयुक्त रविकांत अडसूळ, सहा. आयुक्त नकुल जकाते, कावडे यांनी समक्ष पाहणी करून सर्व निवारा केंद्रे सर्व सोयीसुविधेनुसार सुव्यवस्थीत ठेवणे बाबत सूचना दिल्या आहेत, त्या नुसार पूर्तता करण्यात येत आहे, 

येणाऱ्या काळात सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सतर्क राहण्याबाबत आढावा बैठकीत सूचना दिल्या आहेत. प्रतिसाद टीम देखील सतर्क करण्यात आल्या आहेत,

24x7 वॉर रूम कार्यरत असणार आहे, संपर्क साठी खालील नंबर

70 660 40 330
70 660 40 331
70 660 40 332