yuva MAharashtra तज्ञांपाठोपाठ कृष्णामाईनेही गंभीर इशारा दिला, 'मानवा आता तरी शहाणा हो'...

तज्ञांपाठोपाठ कृष्णामाईनेही गंभीर इशारा दिला, 'मानवा आता तरी शहाणा हो'...


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २९ जुलै २०२४
'नेमिची येतो पावसाळा' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याचबरोबर आता या म्हणी जोडून 'नेमिची येतो आता महापूर' ही नवी म्हण तयार करायला हवे. 2019, 2021 आणि आता 2024 चा महापूर पाहता, अशीच परिस्थिती निर्माण होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच वडनेरे समितीचे प्रमुख राहिलेल्या मा. वडनेरे यांनी कोट्यावधी रुपये खर्च करूनही महापुराचा धोका आपण टाळू शकणार नाही, असा इशारा दिला आहे. याच इशाराच्या पातळीवर कृष्णामाईनेही सांगली-मिरजेच्या शहरांच्या द्वारापर्यंत येऊन इशारा दिला आहे.

हा महापूर निसर्गनिर्मित की मानवनिर्मित यावर काथ्याकुट सुरू असतानाच या महापुरास मानवाने नदीवर अतिक्रमण केलेल्या घटक अधिकतर जबाबदार असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात जर महापुरापासून वाचायचे असेल तर पहिल्यांदा नद्यांना वाचवल्या हवे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि नदीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी योग्य ती हालचाल केली नाही तर हा महापूर शहरेच्या शहरे गिळंकृत करण्यास कमी करणार नाही. यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे गरज आहे. आणि ही जबाबदारी पुन्हा एकाची नसून शासन प्रशासन आणि जनता या सर्वांचीच आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे अत्यावश्यक ठरत आहे.


दरम्यान सांगलीतील आयुर्वेद पुलाजवळील कृष्णा नदी पुराची पाणीपातळी 39 फुटापर्यंत स्थिर असल्याने मोठ्या महापुराचा धोका सध्या टळला असला तरी, त्याची टांगती तलवार पुढील दोन दिवस संभाव्य पावसावर अवलंबून आहे.