yuva MAharashtra वीर शिवा काशीद यांचा महिमा दैदीप्यमान व प्रेरणादायी - पृथ्वीराज पाटील

वीर शिवा काशीद यांचा महिमा दैदीप्यमान व प्रेरणादायी - पृथ्वीराज पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ जुलै २०२४
वीर शिवा काशिद यांच्या कार्याचा महिमा दैदीप्यमान व प्रेरणादायी आहे. शिवरायांच्या स्वराज्यात बारा बलुतेदारांचे योगदान मोलाचे होते. सर्वांनी एकजुटीने शिवरायांना बळ दिले म्हणूनच हे स्वराज्य साकारले गेले, असे उदगार सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील यांनी काढले. महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सांगली जिल्हा व मिरज शहर आणि मिरज तालुका यांच्या वतीने वीर शिवा काशिद यांची पुण्यतिथी मिरज येथील शेतकरी भवन येथे आयोजित करणेत आली होती यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमास महाराष्ट्र नाभिक महामंडळ मुंबई व बारा बलुतेदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, सी. आर. सांगलीकर, बाबा वाघमारे, कारागृह अधीक्षक विवेक झेंडे, नगरसेवक निरंजन आवटी, नाभिक संघटनेचे राज्य संघटक शशिकांत गायकवाड, ऍड. फैय्याज झारी, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल यादव, मिरज शहर अध्यक्ष अरविंद कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.


दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी ९ वा. छ. शिवाजी चौक येथुन वीर शोभा यात्रा संपुर्ण मिरज शहरातुन काढण्यात आली. यानंतर महादेव साळुंखे, दत्तात्रय खंडागळे यांचे व्याख्यान झाले. यावेळी नाभिक समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन पृथ्वीराज पाटील यांना देणेत आले. त्यांनी वीर शिवा काशिद यांच्या स्मारका सहित इतर मागण्या पुर्ण करणेसाठी पाठपुरावा करु व सर्वतोपरी सहकार्य करु अशी ग्वाही दिली.   

याप्रसंगी समाज भुषण पुरस्काराने शशिकांत गायकवाड, अशोक सपकाळ, संगीता काळे, विश्वनाथ गायकवाड, चंद्रकांत गायकवाड,तानाजी जगताप,राजु शिर्के ,विवेक झेंडे, विनायक यादव, बाळासाहेब सन्मुख, डॉ.अशोक गायकवाड,अरुण सन्मुख दिपाली साळुंखे, दीपक क्षीरसागर, नानासो अस्वले, कै. प्रकाश साळुंखे, संजय यादव यांचेसह १०१ जणांना गौरवण्यात आले.

 कार्यक्रमाचे स्वागत अरविंद कदम व प्रफुल्ल यादव यांनी केले. कार्यक्रम स्थळी कुपवाड येथील लहान मुलांचे दांडपट्टा प्रात्यक्षिक ही सादर केले गेले. कार्यक्रमास सागर चिखले, संतोष कदम, मल्हारी सपकाळ, रमेश साळुंखे, अनिल खंडागळे, विजय अस्वले, राजु जाधव, राजु क्षिरसागर, दीपक गंगाधर, राजु कोरे, अरुण कदम, कपिल सुर्यवंशी, आनंदा जाधव यांच्यासह हजारो नाभिक समाज बांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन विजय कडणे यांनी तर आभार सागर चिखले यांनी मानले.