Sangli Samachar

The Janshakti News

कृष्णेतील आवक वाढल्याने पाण्याची धोक्याच्या इशाऱ्याकडे वाटचाल, काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जुलै २०२४
सांगली जिल्ह्याचा दुष्काळी पट्टा वगळता सर्वत्र पावसाने दमदार उपस्थिती लावली आहे. परिणामी सर्वत्र सखल भागात पाणीच पाणी दिसून येत आहे. कृष्णा नदीला तर कोयनेचा विसर्ग नसतानाही. पाण्याने तीस फुटाचे गाठली आहे गेल्या 24 तासात ही पाणी पातळी दहा ते बारा फुटाने वाढल्याचे दिसून येत आहे. परिणामी कृष्णा नदीच्या तीरावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास कृष्णा नदी पात्रा बाहेर पडून शहरी भागासह ग्रामीण भागातील नजीकच्या परिसरात मुक्कामास येण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्याची तयारी सुरू केली आहे. 2019 चा अनुभव लक्षात घेऊन, सर्व ती उपायोजना करण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता, सतर्कता बाळगावी आणि अफवावर विश्वास न ठेवता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.


दरम्यान कृष्णा नदीचे पाणी सांगली शहरातील काका नगर पासून बायपासपर्यंतच्या भागात केव्हाही शिरू शकते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी व योग्य त्या सुरक्षित स्थळे हलवण्याची तयारी महापालिका यंत्रणेने केले असून, मागील आठवड्यात घराबाहेर पडताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षित स्थळी जाण्यासाठी बरोबर घेण्याचे साहित्य याची माहिती देण्यात आली असून, महापालिकेकडून पाणी पातळीवर 24 तास लक्ष ठेवण्यात येत आहे.