| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जुलै २०२४
धाडस आणि आवड याला वयाचे कोणतेही बंधन नसते. साठी पार केलेले अनेक 'धाडसी युवक' आपल्या कृत्याने जगाच्या कौतुकास पात्र ठरत असतात. आणि असेच कौतुक सध्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील जयंतराव केदारराव चव्हाण यांच्या वाट्याला येत आहे ते त्यांनी दुचाकी वरून केलेल्या केदारनाथ यात्रेमुळे.
जयंतराव केदारराव चव्हाण हे कसबे डिग्रज येथील हिम्मत बहादूर चव्हाण घराण्यातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. कुटुंबासह गावातील लोकांचे ते 'लाडके आबा'... गेली अनेक वर्ष जयंतराव पायी, सायकल वरून वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण करीत असतात. महाराष्ट्रासह दक्षिण आणि उत्तर भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांची त्यांनी अशाप्रकारे यात्रा पूर्ण केलेली आहे. आतापर्यंत त्यांनी बारा वर्षे सायकलने तर गेली 14 वर्षे दुचाकीने यात्रा केलेली आहे.
या यात्रेदरम्यान परतीच्या मार्गावर असताना जम्मू येथील एका पेट्रोल पंपावर तेथील युट्युब वर ने त्यांचा व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्याला लाखो व्याज, लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. अशा या समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या धाडसी जयंतराव चव्हाण यांना सॅल्यूट...