Sangli Samachar

The Janshakti News

पूर काळात सतर्क राहून प्रशासनाच्या सहकार्य करावे - जिल्हाधिकारी व आयुक्तांचे आवाहन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २३ जुलै २०२४
आज जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगली येथील सरकारी घाट, सूर्यवंशी प्लॉट परिसर याची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितीत अधिकाऱ्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली तर आवश्यक त्या उपाययोजना करणे कामी सूचना देण्यात आला आहेत .
 
जिल्हाधिकारी व मा आयुक्त यांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत स्थापन केलेल्या वॉर रूमला भेट देऊन वॉर रूम मधील कामकाज बाबत माहिती घेतली. या वेळी डॉ राजा दयानिधी यांनी सांगितले की, कोयना धरण परिसरात जास्त पाऊस पडला आणि पाणी पातळीमध्ये वाढ झाली तर नागरिकांनी प्रशासनाकडून दिलेल्या सुचेनानुसार नजीकच्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याचे आहे.


नागरिकांनी या पूर्वी प्रशासनने सूचित केल्या नुसार अत्यावश्यक असे साहित्य सोबत घेऊन स्थलांतर व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे प्रशासनांच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली असून संभाव्य आपत्ती साठी प्रशासन तयार असून एन डी आर एफ टीम , अग्निशमन दल , महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सुसज्ज आहे. निवारा केंद्र यांचा आढावा घेतला असून नागरिकांची कोणती ही गैर सोय होणार नाही असे नियोजन केले आहे. असे डॉ. दयानिधी यांनी म्हटले आहे

दरम्यान आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अति. आयुक्त रविकांत अडसूळ ,चंद्रकांत खोसे हे पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सहा. आयुक्त सहदेव कावडे, नकुल जकाते हे अधिकारी पूर बाधित क्षेत्रात कार्यरत आहेत, नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यासाठी पथक देखील कार्यरत आहे.