| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. १ जुलै २०२४
आठ दिवसापूर्वी पडलेल्या वळीव पावसाने मिरजेतील रुईकर कॉलनी च्या पाण्याने रस्त्यावरील पूल नुकत्याच झालेल्या वळीव पावसाने एका रस्त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दोन कोटींचा निधी मंजूर केला. आठ दिवसापूर्वी केलेला रस्ता केवळ एकाच पावसात वाहून गेल्याने वादाचा विषय ठरला होता. रुईकर कॉलनीतील नागरिकांनी याबाबत तक्रारीचा पाऊस पाडला होता.
ही बाब लक्षात आल्यानंतर जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. आता हा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी असून, एकाच पावसात वाहून गेलेल्या रस्त्याच्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करणे ऐवजी निधी मंजूर करून आणल्याने चर्चेचा विषय बनला आहे.