| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जुलै २०२४
पट्टणशेट्टी शोरूम ते सांगलीवाडी टोल नाक्यापर्यंत बायपास मार्गावर एकही पथदिवा नसल्याने, रात्रीच्या वेळी या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. या मार्गावरून कष्टकरी महिलांची, नर्सिंग कॉलेजच्या मुली, नागरिक यांची मोठी वर्दळ असते. यावेळी सर्वांना रात्रीच्या अंधारात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे येथे तातडीने पथदिवे बसवण्याच्या मागणीसाठी जयश्री ताई यांनी या परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन रात्री कंदील आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना जयश्रीताई म्हणाल्या की, बायपास मार्गावर पथदिवे लावण्या संदर्भात वेळोवेळी नागरिकांकडून सूचना, निवेदने देण्यात आली आहेत. मात्र महापालिका प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. भविष्यात कोणतीही मोठे दुर्घटना होऊ नये व महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी येथे कंदील आंदोलन करून महापालिकेचा निषेध करण्यात येत आहे. यापुढे महापालिकेने तात्काळ पथ दिवे लावण्याची अंमलबजावणी केली नाही तर रास्ता रोको व इतर मार्गावर हे मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जयश्री ताई यांनी बोलताना दिला.
यावेळी डॉ. शरद घाडगे, नगरसेविका रोहिणी पाटील, तसेच कांचन कांबळे, संगीता सुनके, मदन भाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, प्रकाश मुळके, अजित सूर्यवंशी, उदय पाटील, सतीश साखळकर, रत्नाकर नांगरे, अविनाश जाधव, भाऊसाहेब पवार, शितल लोंढे, नितीन चव्हाण, मयूर बांगर, अवधूत गवळी, अमित लाळगे, भारत बोथरा, जयराज बर्गे, संजय गवळी, योगेश्वर सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी, ऋतुराज लाले, शुभम घोरपडे, अभिजीत कारंडे, संवेद पाटील, लकी ढिल्लो, करण कांबळे, विवेक रणदिवे, आदित्य कारंडे या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.