yuva MAharashtra पाठीत अडकलेल्या कुऱ्हाडीसह माधवनगरमध्ये फिरणाऱ्या वळूवर अखेर उपचार !

पाठीत अडकलेल्या कुऱ्हाडीसह माधवनगरमध्ये फिरणाऱ्या वळूवर अखेर उपचार !


| सांगली समाचार वृत्त |
माधवनगर - दि. १७ जुलै २०२४
माधवनगर परिसरात कुणा अज्ञाताने महिनाभरापासून फिरणाऱ्या एका भटक्या वळूवर कुऱ्हाडीचा वार केला, पण शेपटीजवळ खोलवर रुतलेली ती कुऱ्हाड काढण्यापूर्वीच वळू तेथून सटकला आणि गावभर रक्तबंबळ अवस्थेत तो फिरत होता.

क्रुरतेची सीमा गाठलेली ही घटना लक्षात आली तेव्हा, माधवनगर मधील काही नागरिकांनी संजय नगर पोलिसांना व प्राणीमित्रांना दिली. त्यानंतर तात्काळ ॲनिमल रेस्क्यू पथक आणि ॲनिमल राहत च्या सदस्यांनी या वळूवर उपचारासाठी माधवनगर मध्ये धाव घेतली. परंतु सैरभैर झालेला हा वळू तसाच धावत होता. त्यामुळे खोलवर रुतलेली कुऱ्हाड वळूला बेशुद्ध केल्याशिवाय काढणे अशक्य होते, हे लक्षात आल्यानंतर ॲनिमल राहत्या पशुवैद्याने त्याला भूल दिली व अखेर कुऱ्हाड बाहेर काढली.


कुऱ्हाड काढत असतानाही बराच रक्तस्राव होत होता. पण तो वेळीच थांबविल्याने वाळूचे प्राण मात्र वाचू शकले. पोलिसांनी आता पुढील उपचारासाठी त्याला सुरक्षित स्थळी हलवले आहे. दरम्यान मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा प्राणीप्रेमींनी निषेध केला असून, वळुच्या जीविताशी असे खेळणाऱ्या संबंधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली जात आहे.