Sangli Samachar

The Janshakti News

फिर्यादीच बनला आरोपी, कर्ज वसुलीसाठीचा तगादा चुकवण्यासाठी ट्रक चोरीचा बनाव !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २३ जुलै २०२४
यशवंत गडदे (रा गोंडेवाडी, ता सांगोला) यांचा मिरज पंढरपूर मार्गावरील शेतकरी ढाबा येथून अकरा रोजी चोरीस गेल्याची तक्रार निरज शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दाखल गुन्ह्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहा. पंकज पवार, कर्मचारी संकेत मगदूम, अमोल ऐवळे, सोमनाथ गुंडे हे करीत होते. या पथकाला विश्रामबाग येथे ट्रक उभे आसल्याची पथकाला माहिती मिळाली. हे पथक तेथे पोहोचल्यानंतर, दोन तरुण तेथे संसदरीत्या वावरत असल्याचे लक्षात आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करत असता, त्यांनी आपले नाव बिरदेव गडदे व गणेश भोसले असल्याचे सांगितले. पोलीस खाक्या दाखविताच, खरा प्रकार उघडकीस आला.


फायनान्स कंपनीचे हप्ते थकल्याने ट्रकची परस्पर विक्री करून मित्राचा ट्रक नकली नंबर प्लेट लावून चोरीचा बनाव करण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेने काल उघडतेस आला. याबाबत अधिक माहिती अशी की बिरदेव गडदे याने आपले चुलते यशवंत गडदे यांच्या नावे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन माल ट्रक (एमएच-50-4875) खरेदी केला होता परंतु कर्जाचे हप्ते थकल्याने तो परस्पर मोहन शेंबडे यांना विकला. त्यानंतर आपल्या मित्राचा ट्रक (एमएच 10 झेड 45 84) नंबर प्लेट बदलून त्यावर आपल्या मालकीच्या ट्रकचा नंबर त्यावर लावला. आणि आपले चुलते यशवंत गडदे यांना ट्रक चोरीस गेल्याची फिर्याद करण्यास लावली. पोलिसांनी दोन्ही ट्रक व बिरदेव गडदे, गणेश भोसले यांना ताब्यात घेतले आहे.