yuva MAharashtra गद्दार आमदार आणि जादाच्या मतांबद्दल नाना पटोले स्पष्टच बोलले, !

गद्दार आमदार आणि जादाच्या मतांबद्दल नाना पटोले स्पष्टच बोलले, !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १४ जुलै २०२४
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक संपली तरी महाआघाडीतील फुटलेल्या त्या मतांवरून सुरू झालेले राजकारण मात्र संपले नाही. पराभूत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांनी काँग्रेससह राष्ट्रवादी शरद पवार गटावरही गद्दारीचा आरोप केला आहे. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार किंवा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र त्या गद्दार आमदारावर शरसंधान केले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की क्रॉस वोटिंग केलेल्या सात आमदारांच्या नावासह मी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आजच अहवाल पाठविला असून या आमदारांसाठी विधानसभा निवडणुकीत पक्षाची दारे बंद झाली आहेत. केंद्रीय वरिष्ठ नेते त्या आमदारांबाबत कारवाईचा निर्णय घेणार आहेत. 


पक्षाशी निष्ठा न ठेवणाऱ्या लोकांचा कचरा या निमित्ताने बाहेर पडला असे मला वाटते, असे सांगून यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की हे लोक कधीही पक्षाला धोका देऊ शकतात विधानसभा निवडणुकीत यांच्यापैकी एकाला जरी तिकीट दिले तर तो इंदूर पॅटर्न करून महायुती सोबत जाऊ शकतो.

शेकापचे जयंत पाटील यांच्या पराभवावरून नाना पटवले म्हणाले की काँग्रेसने आपल्याकडे अतिरिक्त पहिल्या पसंतीचे काही मते त्यांना दिले असते तर विजय झाला असता असे आता म्हटले जाते आहे. परंतु जयंत पाटील यांनी आपल्याकडे पुरेशी मते आहेत, असे जाहीरपणे ते सांगत होते. आमच्याकडे त्याने मतांबाबत कोणतीही विचारणा केली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी जादाच्या मतांबाबत विचारणा केल्यामुळे त्यांनाही मते देण्यात आली. ठाकरे यांनी आपल्या पक्षाला विचारून उमेदवार दिलेला नव्हता, तरीही त्यांना मते देत आम्ही आघाडी धर्म पाळला नाही, या आरोपात काही तथ्य नाही असे नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान फुटलेल्या आमदारांमध्ये हिरामण खोसकर यांचे नाव आल्याने ते संतप्त झाले आहेत. वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जरूर कारवाई करावी, परंतु माझ्या निष्ठेवर शंका घेऊ नये. असे त्यांनी म्हटले आहे. नाव जाहीर करण्यापूर्वी त्यांनी मतदान प्रक्रियेची शहानिशा करून घ्यायला हवी होती असेही खोसकर यांनी म्हटले आहे. 

एका वृत्तानुसार 19 जुलै 2024 रोजी केंद्रीय हा एक मांड मुंबईत येत असून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फुटलेल्या आमदारांबाबत कारवाई होणार असल्याचे सांगितले जाते.