Sangli Samachar

The Janshakti News

पोलिसांकडून ऊसाच्या शेतीतील लाखो रुपयाची गांजाची झाडे जप्त !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई दि. ३ जुलै २०२४
गांजाला मिळणारी किंमत, आणि भारतातील मोठी बाजारपेठ यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतात गांजाची लागवड करीत असतात. असाच एक प्रकार खानापूर तालुक्यातील रेणावी येथे उघड केस आला असून विटा पोलिसांनी राजाराम आनंदा गुजले (वय ५०, रा. रेणावी) या शेतकऱ्यास अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हवी पदार्थांचे उत्पादन, तस्करी विक्री करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. या विभागाचे एक पथक अशा व्यक्तींच्या शोधात होते. त्यावेळी येणारी येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. खानापूर तालुक्यातील रेवनावणी गावच्या हद्दीत उसाच्या शेतात लावलेल्या 100 किलो वजनाच्या गाजराची उंचीची झाडे लावण्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली.

उसासह अन्य पिकांमध्ये गांजाचे लहान-मोठे असे 240 झाडे यावेळी सापडले त्याचे वजन 100 किलो भरले बाजारात याची किंमत दहा लाख 7 हजार रुपये आहे गांजाची झाडे जप्त करून शेताचा मालक गुजले याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे.


विट्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल येळेकर, किरण खाडे, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबे-वाघ, विलास मोहिते, महादेव चव्हाण, गणपत गावडे, प्रमोद साखरपे, अमोल नलावडे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.