| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३० जुलै २०२४
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यासाठी प्रत्यक्ष पटलावर सत्ताधारी पक्षावर बरसण्याची ही पहिलीच वेळ... तसं तर विशाल दादाला लढण्याचं बाळकडूच मिळालेलं. आजोबा... वसंतदादा इंग्रजांविरुद्ध लढले. छातीवर कोणीही झेलली. वडील स्व. प्रकाश बापू पाटील यांचा संसदेत भले आवाज कमी घुमला असेल, पण मतदार संघासाठी त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. काका स्व. मदन भाऊ यांनीही संसद गाजवली. हे पहात संसदेत पोहोचलेले विशाल दादा यांनी आपल्या दमदार आवाजानं संसद दणाणून सोडले. त्यांच्या भाषणादरम्यान विरोधी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी अनेकदा बाकी अजून विशाल दादांचे कौतुक केले.
अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय बाबत आपल्या दमदार आवाजात त्यांनी मोदी सरकारला धारेवर धरलेच, परंतु अर्थसंकल्पात सांगलीला डावल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश का करण्यात आला नाही ? आमच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात तरतूद का नाही ? टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजनांसाठी ए आय बी पी योजनेतून निधी का देण्यात आला नाही ? असे खडे बोल विशाल दादांनी मोदी सरकारला केले.
आपल्या घामासान भाषणात विशाल दादांनी, दीड तासाच्या भाषणात अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राचे एकदाही नाव घेतले नाही, याबद्दल जोरदार टीका केली. आसाम बिहार मधील महापुराचा उल्लेख झाला, परंतु महाराष्ट्रातील महापुराच्या नुकसानीवर त्या का बोलल्या नाहीत ? असा सवाल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केला. बिहार सिंचनासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद केली मात्र टेंभू म्हैसाळ योजनेचा साधा उल्लेख करण्याची ही गरज तुम्हाला वाटली नाही, असेही यावेळी विशाल दादांनी खडे बोल सुनावले.
कराचा 37% ही हिस्सा महाराष्ट्रातून येतो. पाच ट्रिलियन इकॉनोमीची स्वप्ने पाहताना, एक ब्रिलियंट वाटा महाराष्ट्राचा असला तरच ते शक्य होणार आहे. महाराष्ट्राच्या सहभागाशिवाय भारताचा विकास अशक्य आहे, अर्थसंकल्पावर टीका करताना विशाल दादांनी महाराष्ट्र गीतातील "दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा" या ओळी सादर त्यांनी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदारावर टोलेबाजी केली.
आपल्या दमदार आवाजातील भाषणात विशाल दादा यांनी, दिल्लीचे तख्त राखण्याची जबाबदारी महाराष्ट्र घेत होता, घेत आहे आणि घेत राहील हा विश्वास व्यक्त करतानाच आर्थिक सामाजिक साहित्यिक क्षेत्रात हे महाराष्ट्राने 'करून दाखविले' असे सांगितले. केंद्रातील सरकार सलामत राखण्याचे काम तुमच्या 17 खासदारांनी केले आहे. तुम्ही आमच्याकडे पाहू नका पण त्यांच्याकडे पाहून तरी निधी द्या, असे सांगत विशाल दादांनी "आज तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या दर्द है जो छुपा रहे हो |" हा शेर सुनावला. त्यामुळे चिंता आहे त्यांच्या मतदारसंघात जाऊन ते काय ? अर्थसंकल्पातून मिळाले काय ?
विशाल दादा म्हणाले की कुबड्या घेऊन चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देश बुडवू नये एवढीच अपेक्षा आहे. शेतकरी कर्जमाफी, महागाई नियंत्रण, ईपीएस पेन्शन, भूमिहीन शेतकरी सन्मान योजना, खते व बियाणांवर जीएसटी नको या सगळ्या मागण्या तुम्ही अमान्य केल्या. फूड सबसिडी वरील निधी कमी केला, खतांचे अनुदान कमी केले, घरासाठी फक्त पाच टक्के जादा तरतूद केली. नव्या योजनांचा फक्त उल्लेख करता त्या काय आहेत ? असा सवाल करून विशाल दादा म्हणाले की 60000 कोटी कुठे जाणार हे स्पष्ट का सांगत नाही ? 'बोलाचीच कडे बोलाचाच भात घेऊन या तृप्त कोण झाला ? या राजांच्या अपंगातील ओळींचा आधार घेत विशाल दादांनी म्हटले की, ज्या राज्यांचा जीडीपी घसरला तिथे भाजप हरला आहे असेच अर्थ धोरण राहिले तर भाजपचे पतन निश्चित आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि हरियाणा भाजप पराभूत होणार हे नक्की असे त्यांनी ठणकावून सांगितले.
विशाल दादांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री यावर हल्ला चढवण्याचे धाडस दाखवत पुणे म्हटले की, अर्थसंकल्पावर खुश असणारे काही खासदार मला म्हणाले की विशाल हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. पण अडचण अशी आहे की ट्रेलर पाहूनच पिक्चर चा अंदाज लागत नाही. याबाबत बोलताना विशाल दादा म्हणाले की परवा मी पत्नीसोबत ट्रेलर पाहून एका पिक्चर ला गेलो आणि अर्ध्या तासातच कंटाळून बाहेर पडलो अर्थसंकल्पाची अवस्था अशीच आहे कारण या अर्थसंकल्पाचा दिग्दर्शक हीच खरी अडचण आहे.
दरम्यान, विशाल दादांच्या संसदेतील भाषणाची क्लिप सांगलीसह संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत असून, बऱ्याच वर्षांनी सांगलीला अशा दमदार आवाजाचा खासदार मिळाल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.