| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जुलै २०२४
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सन 2023-24 वर्षाकरीता शिष्यवृत्ती, फ्रिशीप, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, निवार्ह भत्ता या योजनांचे अर्ज करण्यासाठी दि. 15 जुलै 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती/फ्रिशीप/राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती/ निवार्ह भत्ता या योजनेंतर्गत अर्ज अद्याप भरलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज दि. 15 जुलै पूर्वी भरावा. सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी महाविद्यालयातील पात्र परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत समाज कल्याण सांगली कार्यालयास्तरावर पाठवावेत, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.