| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ जुलै २०२४
लोकसभा निवडणुकीमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे बी नड्डा यांचा वाढलेला मुक्काम लवकरच संपणार असून उत्तर अधिकारी डिसेंबर महिन्यात पदभार स्वीकारेल. यासाठी अनेक नावांची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू होते. यामध्ये एक नाव होते ते महाराष्ट्रातील विनोद तावडे यांचे.
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना भाजपने बिहारच्या प्रभारी पदाची जबाबदारी पुन्हा एकदा दिल्याने, ते या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. वास्तविक विनोद तावडे हे राष्ट्रीय राजकारणातील वरिष्ठ नेते ठरले होते अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा त्यांच्या वरील असलेल्या विश्वास यामुळे ते भाजपचे पुढील राष्ट्रीय अध्यक्ष असतील असे सांगण्यात येत होते. परंतु ही शक्यता आता मावळल्यामुळे तावडे यांचे कार्यकर्ते नाराज झाले असल्याची चर्चा आहे.
लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र, हरियाणा विधानसभेची निवडणूक लक्षात घेता भाजपच्या अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता सध्या मावळली आहे. त्यामुळे जे. पी. नड्डा याचा उत्तराधिकारी नवीन वर्षात अर्थात 2025 मध्येच निवडला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.