Sangli Samachar

The Janshakti News

यशोधन कार्यालयातील लाडकी बहिण योजनासाठीच्या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा - पृथ्वीराज पाटील !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ जुलै २०२४
शासनाच्या महिला व बालविकास खात्यातफे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतंर्गत लाभार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म, सांगलीतील यशोधन सेवा व संपर्क कार्यालयात मोफत भरुन घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सांगली शहरात वार्डनिहाय हे काम सुरु आहे. आमच्या लाडक्या भगिनींनी या मोफत सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.

२१ ते ६५ वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिलांनी स.१०ते ५ या वेळेत यशोधन सेवा व संपर्क कार्यालय, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेजवळ, सांगली मिरज रोड येथे संपर्क करावा. येताना आधार कार्ड, बँक खाते पासबुक झेरॉक्स प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड झेरॉक्स, योजनेचे अटी व शर्ती पालन करण्याचे हमीपत्र, उत्पन्न दाखला (फक्त पांढऱ्या रेशन कार्ड धारकांसाठी) तसेच रहिवासी पुरावा म्हणून पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी एक अशी कागदपत्रे घेऊन यायचे आहे. अशी माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे. शहरातील प्रत्येक वार्डातही ही मोफत सुविधा पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या वतीने उपलब्ध करण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले


आपल्याच सांगलीकर भगिनींना सेवाभावी वृत्तीने मदत करावी, शासकीय यंत्रणेत त्यांची हेळसांड होऊ नये, या भावनेतून ही सेवा उपलब्ध केल्याची माहिती पृथ्वीराज पाटील व फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम यांनी दिली.