| सांगली समाचार वृत्त |
श्रीनगर - दि. ३० जुलै २०२४
भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कारगिल प्रमाणे युद्ध भडकण्याचा दावा पाक व्याप्त काश्मीर मधील सर्व परिचित कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी केला असून, जम्मू आणि काश्मीरवर लवकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे विशेष म्हणजे हा हल्ला दहशतवाद्याकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली आहे. मिर्झा यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानच्या साधारण सहाशे सैनिकांनी कुपवाडा भागात घुसखोरी केले आहे.
अमजद मिर्झा यांच्या दाव्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा कार्यरतील प्रमाणे युद्ध होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानचे एस एस जी जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल आदिल रेहमानी हे भारताच्या जम्मू या भागावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानी त लष्कराची संपूर्ण एसएससी तुकडीने कुपवाडा आणि इतर भागात घुसखोरी केली आहे. तसेच इतर ठिकाणचे स्थानिक जिहादी सक्रिय झाले असून यांच्याकडूनच एस एस जी च्या सैनिकांना भारतीय भूभागात मोजण्यासाठी मदत केली जात आहे.
पाकिस्तानचा लेफ्टनंट करणार शाहिद सलीम जिजू हा सध्या भारतीय हद्दीत असून पाकिस्तानी सैनिकांचे नेतृत्व करीत आहे कर्नल शाहिद कडून भारतीय लष्कराच्या 15 कार्पसचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही मिर्झा यांनी म्हटले आहे दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराच्या यशस्वी च्या आणखीन दोन तुकड्या मुजफ्फरा बाग मध्ये सज्ज असून, या तुकड्या जम्मू आणि काश्मीरच्या माध्यमातून भारतात घुसकरी करणार आहेत. याआधी 40 ते 60 खूंखार दहशतवादी जम्मू भागात घुसण्याचा दावाही मिर्झा यांनी केला आहे.
दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. अमजद मिर्झा यांच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्करास अलर्ट राहण्याच्या सूचना वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सह सर्वत्र हा चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनलेला आहे.