Sangli Samachar

The Janshakti News

सांगली महापालिकेच्या कार्डीयाक अँब्युलन्समुळे गरजू रुग्णांची सोय होणार - आयुक्त शुभम गुप्ता !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली दि. ११ जुलै २०२४
सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या ताफ्यात पहिली कार्डीयाक रुग्णवाहिका दाखल झाली असून. मा शुभम गुप्ता यांनी कार्डीयाक अँब्युलन्सची महापालिका आवारात पाहणी केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम गोऱ्हे यांच्या निधीतून ही रुग्णवाहिका 
देण्यात आली आहे. उद्या मा. मुख्यमंत्री आणि मा. उपसभापती यांच्याहस्ते विधान भवनामध्ये या रुग्णवाहिकेचा लोकार्पण कार्यक्रम होणार आहे.


सदरची रुग्णवाहिका ही महापालिकेकडून गीतांजली सेवाभावी संस्थेला देण्यात येणार असून त्या संस्थेकडून रुग्णवाहिका सेवा दिली जाणार आहे. यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुनीता मोरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती ना. नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरची रुग्णवाहिका मंजूर करून घेतली होती. या रुग्णवाहिकेची किंमत 45 लाख इतकी असून सदरची रुग्णवाहिका ही पूर्णपणे वातानुकूलित आहे. या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची सोय असून रुग्णांना शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कानुसार दर आकारणी केली जाणार आहे.

महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी या रुग्णवाहिकेची पाहणी करीत कंपनीकडून रुग्णवाहिका महापालिकेच्या ताब्यात घेतली.




यावेळी शिवसेना नेत्या सुनीता मोरे, राहुल मोरे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील, जलनिस्सरन अभियंता चिदानंद कुरणे, कार्यशाळा प्रमुख तेजस शहा, विनायक जाधव , वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका तोडकर आदी उपस्थित होते. सदर रुग्णवाहिका महापालिकेकडून रीतसर करारपत्र करीत गीतांजली सेवाभावी संस्थेच्या स्वाधीन करण्यात आली आहे.