Sangli Samachar

The Janshakti News

तरुण-तरुणींनो खबरदार ! शरीरावर टॅटू काढाल तर सरकारी नोकऱ्या पासून मुकाल !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ जुलै २०२४
क्रिकेटपटू असोत व इतर खेळातील नामवंत खेळाडू किंवा मग बॉलीवूडमधील सेलिब्रिटी. आपल्या शरीराच्या विविध भागावर टॅटू काढून 'चमकोगिरी' करीत असतात. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे फॅन्स हे त्यांच्याप्रमाणेच आपल्या शरीरावर असे टॅटू काढून घेत असतात. परंतु सरकारी नोकरीच्या अपेक्षा ने तयारी करत असलेल्या तरुण तरुणींना शरीरावर असे टॅटू काढण्यास बंदी आहे. त्यामुळे तुम्ही टॅटू प्रेमी असाल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल, तर तुम्हाला दोन्ही पैकी एक एकाची निवड करावी लागेल. आता या नोकऱ्या कोणत्या ?... पहा ही यादी...

भारतीय प्रशासकीय सेवा - IAS (Indian Administrative Service)
भारतीय महसूल सेवा - IRS (Internal Revenue Service)
भारतीय पोलीस सेवा - IPS (Indian Police Service)
भारतीय परराष्ट्र सेवा - IFS (Indian Foreign Service)
भारतीय हवाई दल - Indian Air Force
भारतीय तटरक्षक दल - ( Indian Coast Guard)
इंडियन आर्मी - (Indian Army)
भारतीय नौदल - ( Indian Navy)
पोलीस - (Police)


वास्तविक शरीरावर टॅटू काढणे हे अनेक आजारांना निमंत्रण देण्यासारखे असते. परंतु अशा धोक्यांची परवा न करता तरुणाई शरीरावर विविध प्रकारचे टॅटू काढत असते. आता वरील शासकीय नोकरीत टॅटू काढण्यावर बंदी का ? तर तज्ञांच्या मते असे तरुण-तरुणी कामापेक्षा आपल्या देखाव्यावरच लक्ष केंद्रित करू शकतात. शिवाय गोपनीय सुरक्षा यंत्रणेत काम करणाऱ्या तरुण-तरुणींची शत्रु पक्षाला लवकर ओळख पटू शकते. ज्यामुळे संरक्षण खात्यात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना आपल्या या छंदावर नियंत्रण ठेवण्याचे नितांत आवश्यकता असते.

याशिवाय शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे जनता आदरयुक्त नजरेने पाहत असते. असे टॅटू काढण्यामुळे सदरचे तरुण-तरुणी बाबत त्यांच्या मनात हा आदर कमी होऊ शकतो. कारण अनेकांच्या मध्ये टॅटू काढणे हे चंचलतेचे लक्षण मानले जाते. म्हणून इतर क्षेत्रातील सरकारी नोकरीतही टॅटू काढणाऱ्या व्यक्तींचे संख्या अगदी नगण्य दिसून येते.