Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील दोन मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने थोपटले दंड, चंद्रहार पाटील आक्रमक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २१ जुलै २०२४
लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात घामासान पाहावयास मिळाले. त्यामध्ये महाआघाडीच्या ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील चारी मुंड्या चीत झाले. परंतु याची कारणमीमांसा शोधत बसण्यापेक्षा, चंद्रहार पाटील यांनी सांगली मधील दोन मतदारसंघात थोपटले आहेत. नुकतीच चंद्रावर पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मुंबई येथे भेट घेतली व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मिरज व खानापूर-आटपाडी मतदार संघ शिवसेना ठाकरे गटाने लढविल्यास आपण येथे यश संपादन करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

या भेटीनंतर चंद्रावर पाटील यांनी आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आणि कोल्हापूर येथील कुस्तीमधील गुरुंचीही भेट घेणार असून त्यांनाही या दोन मतदारसंघातील शिवसेनेच्या ताकतीबाबत अस्वस्थ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


दरम्यान खानापूर आटपाडी व मिरज मतदारसंघावर महाआघाडीतील काँग्रेसनेही तयारी सुरू केले असून, या मतदारसंघात महायुती समोर तगडे आव्हान उभे करण्याची गरज असल्याने, लोकसभेप्रमाणे तोंडघशी पडायचे नसेल तर, या दोन्ही ठिकाणी तुल्यबळ उमेदवाराची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात की सामंजस्याने निवडणुकीला सामोरे जातात, याचे उत्तर येणाऱ्या काळात दिसून येईल.