| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ९ जुलै २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वागणार असून सर्वच राजकीय पक्षांच्यावतीने याबाबत तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आपला टक्का वाढवीत विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःची ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे साहजिकच या पक्षाकडून इच्छुक उमेदवारांचे मोठे गर्दी आहे.
या गर्दीत सध्या सर्वाधिक नाव चर्चेत आहे ते राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी मंत्री राहिलेले स्व. आर आर पाटील व विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचे. गत पाच वर्षापासून रोहित पाटील यांनी चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे. अनेक विकास कामासाठी आ. सुमनताई पाटील यांच्या माध्यमातून त्याने मोठा निधी उपलब्ध करीत, विकास कामाचा डोंगर उभा केला आहे.
रोहित पाटील यांनी नुकतेच 25 वर्षात पदार्पण केले आहे. त्यामुळे आगामी विधान ते राष्ट्रवादीतर्फे रोहित पाटील हेच रिंगणात असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने स्पष्ट संकेत दिले आहेत.
तासगाव येथील एका काय जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की आमदार सोबतही यांच्यानंतर आता तुम्ही रोहित पाटील यांच्याशी पाठीशी ठामपणे उभे रहा, असे आवाहन जनतेला केले आहे. तुम्ही रोहितला ताकद द्या आम्ही सर्व प्रश्न सोडवू, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.