yuva MAharashtra यापुढे आयएसआय असलेली भांडीच खरेदी करावी लागणार, अन्यथा दंडाचा भुर्दंड?

यापुढे आयएसआय असलेली भांडीच खरेदी करावी लागणार, अन्यथा दंडाचा भुर्दंड?


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ६ जुलै २०२४
केंद्र शासन लवकरच तुमच्या स्वयंपाक घरापर्यंत पोहोचणार असून, याबाबतचे नियमावलीचे पालन केले नाही तर दंडही भरावा लागणार आहे. आपण स्वयंपाक घरात दैनंदिन वापरात असलेल्या भांड्या बाबतचा हा निर्णय सर्वसामान्यांना कितपत पचनी पडतो, यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.

या संदर्भात सरकारने एक आदेश जारी केला असून, स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्याबाबत भारतीय मानक ब्युरो ने सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठीचा हा निर्णय आहे. केंद्र सरकारच्या या आदेशानंतर स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमचे भांडे राष्ट्रीय दर्जाच्या मालकांशी सुसंगत असणं बंधनकारक होणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत डी पी आय आय टी ने नुकताच क्वालिटी कंट्रोलचा आदेश जारी केला आहे त्यानुसार आता स्वयंपाक घरातल्या भांड्यांसाठी आयएसआय मार्क बंधनकारक करण्यात आला आहे.


आयएसआय मार्क नसल्यास काय होईल?
बीआयएसने भारतीय मानक संस्थेचा (आयएसआय) लोगो विकसित केला आहे. उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता राखली जाणं हे याचं काम आहे. बीआयएसने दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या नवीन आदेशानुसार मानक चिन्ह नसलेल्या कोणत्याही स्टेनलेस स्टील किंवा अ‍ॅल्युमिनियम भांड्यांचं उत्पादन, आयात, विक्री, वितरण, स्टोरेज किंवा विक्री डिस्प्लेवर बंदी घालण्यात आली आहे.

सरकारी आदेशाचं पालन न केल्यास दंड आकारण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. हा निर्णय बीआयएसने स्वयंपाकघरातल्या भांड्यांसाठी नुकत्याच तयार केलेल्या मानकांनुसार घेण्यात आला आहे. बीआयएसच्या मानकांनुसार, स्टेनलेस स्टीलसाठी IS 14756:2022 आणि अ‍ॅल्युमिनियम भांड्यांसाठी IS 1660:2024 निश्चित करण्यात आलं आहे.


केंद्र सरकारचा हा आदेश सध्या तरी उत्पादक आणि व्यावसायिक यांच्यासाठी बंधनकारक असला तरी त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. कुठल्याही आयएसआय मार्कची भांड्यांची किंमत आयएसआय मार्क नसलेल्या भांड्यापेक्षा अधिक असते. त्यामुळे हा निर्णय नागरिकांच्या आरोग्याबाबत हिताचा असला तरी सर्वसामान्य व गोरगरीब ही आयएसआय प्रमाणेच महागडी भांडी खरेदी करू शकतील का ? हा कळीचा मुद्दा ठरणार आहे.