yuva MAharashtra राज्यातील जागतिक पदकप्राप्त खेळाडूंसाठी शासन सेवेत थेट नियुक्ती !

राज्यातील जागतिक पदकप्राप्त खेळाडूंसाठी शासन सेवेत थेट नियुक्ती !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ९ जुलै २०२४
टी ट्वेंटी मध्ये जगतजेता ठरलेल्या भारतीय टीमच्या क्रिकेटपटूंना शिंदे सरकारने अकरा कोटी रु. देण्याचे जाहीर केलं होतं. तसेच मुंबईच्या चार खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. यानंतर शिंदे सरकारवर सर्वच क्षेत्रातून टीकेचा भडीमार होत होता. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारला ही नाराजी परवडण्यासारखी नव्हती, आणि म्हणूनच आता यावर मलम पट्टी करण्यासाठी जागतिक कीर्तीच्या खेळामध्ये पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंची शासन सेवेत थेट नियुक्ती करण्यात येणार आहे.


राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करू इच्छिणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल असे सांगण्यात येत आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयाबाबत आता क्रीडा क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे