| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जुलै २०२४
सध्या विशाळगड अतिक्रमण हटवण्यावरून हिंदुत्ववादी संघटनाकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. नुकतेच शाहू महाराजांनी दिलेल्या भेटीदरम्यान जमावाने केलेल्या दगडफेक जाळपोळीमध्ये अनेक घरे व वाहनांचे तसेच गडावरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हिंदुत्ववादी संघटना अतिक्रमण हटवण्यावरून ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर विशाळगडावरील बांधकामे पाडण्यापासून मज्जाव करण्यासाठी 13 जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केले होती. वरील जाळपोळ आणि दगडफेकीचे उच्च न्यायालयाने दखल घेत शुक्रवारी तातडीची सुनावणी घेतली व विशाळगडावरील घरे तोडणाऱ्या वर काय कारवाई केले असा सवाल उच्च न्यायालयाने केला आहे. याप्रकरणी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
सध्या विशाळगडावर एकूण 158 अतिक्रमणे असून त्यापैकी शंभरहून अधिक अतिक्रमानावर कारवाई करण्यात आले आहे ही कारवाई थांबवण्यासाठी 13 याचिकाकर्त्यानी मुंबई धाव घेतली होती. याचिकामध्ये विशाळगडावरील बांधकामांना अंतिम सुनावणी होईपर्यंत संरक्षण देण्याचे मागणी करण्यात आली होती. पावसाळ्यात अतिक्रमणावर कारवाई न करण्याचा शासन निर्णय असतानाही ही कारवाई करण्यात आल्याचे याचिका मध्ये म्हटलं आहे न्या. बर्गिस कुलाबावाला आणि न्या. फिरदोस पुनीवाला यांनी यावरून सरकारचे कान टोचले.
येथील बांधकामांना जर कोर्टाने संरक्षण दिले, तर आंदोलक काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी याबाबतीत समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट सोशल मीडियावरून प्रसारित करू नये, नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. एखादी वादग्रस्त घटना किंवा सोशल मीडियावर पोस्ट निदर्शनास आले तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले असून, जिल्ह्यात सर्व पोलीस ठाण्यांमध्ये रूट मार्च काढण्यात आला.