Sangli Samachar

The Janshakti News

शरद पवार एकनाथ शिंदे यांच्या भेटीने मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटण्याच्या उंबरठ्यावर !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ जुलै २०२४
गेली काही महिने महाराष्ट्रात गाजत असलेला मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या समस्यावर तोडगा काढण्यात यशस्वी ठरू शकणारे शरद पवार यांची मुंबईत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये हा तिढा सोडवण्यासाठी बराच खल झाला. आणि शरद पवार यांनी सुचवलेला मार्ग शिंदे सरकारने स्वीकारला तर हा तिढा विधानसभा निवडणुकीत पूर्वी सुटू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी या मुद्यावर राजकारण न करता तोडगा काढावा अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडल्याचे समजते. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे.

या बैठकीत शरद पवार यांनी राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या उपोषणकर्त्यांना कोणती आश्वासने दिली आहेत? याची माहिती घेतली. तसेच सरकार हा तिढा सोडविण्यासाठी कोणती पावले टाकत आहे? हे देखील त्यांनी जाणून घेतले. या विषयावर राज्य सरकारने मराठा - ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन सहमतीने निर्णय घ्यावा. सरकार या दोन्ही समाजाच्या हिताचा जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा राहील अशी हमी पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.


मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा होईल.

मराठा आरक्षणावर चर्चा

बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात २० मिनिटांची बंद दाराआड चर्चा झाली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांनी सरकारला दिलेल्या आश्वासनांवर चर्चा नसल्यामुळे विरोधी पक्षांमध्ये नाराजी होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी आगामी काही दिवसांत सर्वपक्षीय बैठक आयोजित करून विरोधकांनाही निमंत्रण देण्याचे आश्वासन दिले.

सर्वपक्षीय बैठकीला हिरवा कंदील ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीला हिरवा कंदील देण्याचा विचार केला आहे. शंभूराजे देसाई यांनी सांगितले की, "पवार साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेल्या बैठकीत काय चर्चा झाली हे आम्हाला माहित नाही." मागील बैठकीत काही उपस्थित नसल्यामुळे या संदर्भात यावेळी वेगळे चर्चा झाली की नाही याबाबत कल्पना नाही.

मराठा ओबीसी वादावर चर्चा

मराठा ओबीसी वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेत ओबीसी नेत्यांना दिलेल्या आश्वासनांवर चर्चा झाली नाही. यामुळे विरोधकांमध्ये नाराजी आहे. आगामी सर्वपक्षीय बैठकीत हे मुद्दे चर्चेला येण्याची शक्यता आहे.

आगामी सर्वपक्षीय बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी काही दिवसांत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत विरोधकांनाही निमंत्रण दिले जाईल. बैठक आंतरजातीय सलोखा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.