| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० जुलै २०२४
सांगली शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत करावी यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच जिल्हा प्रशासन व महापालिका त्याचप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासना मार्फत असलेल्या पूरग्रस्तांच्या स्थलांतर आणि मदतीच्या कार्याला गती द्यावी, असा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीस माजी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, पक्षाचे विधानसभा, लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक शेखर इनामदार, किसान मोर्चाचे प्रदेशचे पै. पृथ्वीराज पवार आदि प्रमुख उपस्थित होते.
आमदार गाडगीळ यांनी तातडीने निमंत्रित केलेल्या या बैठकीत सांगली विधानसभा क्षेत्रात उद्भवलेल्या पूर परिस्थितीबाबत पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. या परिस्थितीमध्ये स्थलांतरित पूरग्रस्तांची राहण्याची जेवण्याची माझे काटेकोर देखरेखीमध्ये व्यवस्था करावी. जिथे प्रशासनाची मदत पोहोचणार नाही तिथे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पोहोचून प्रत्येक पूरग्रस्तापर्यंत आपली मदत पोहोचवण्यासाठी तत्परतेने कार्यक्षम रहावे असे आवाहन हा गाडगीळ यांनी केले.
या बैठकीत माजी खासदार संजय काका पाटील, माजी आमदार दिनकरदादा पाटील, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव पै. पृथ्वीराज पवार, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशचे आश्रफ वांकर, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, प्रदेश कार्यकारणी सदस्य धीरज सूर्यवंशी, जिल्हा प्रवक्ता मुन्नाभाई कुरणे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महिला मोर्चा अध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, विश्वजीत पाटील, दीपक माने, माजी नगरसेवक युवराज बावडेकर, अविनाश मोहिते, श्रीकांततात्या शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. सुधीर दादा घाडगे म्हणाले की राज्य प्रशासन तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासन पूर परिस्थितीवर नियंत्रण करण्याचा तसेच पूरग्रस्तांना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेच परंतु भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या मदत कार्यात पुढाकार घेतला पाहिजे संकट पूर्णपणे दूर होईपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन पूरग्रस्त नागरिकांना दिलासा दिला पाहिजे पूरग्रस्तांच्या मध्ये तिथ कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे आपण सर्वांनीच काटेकोर लक्ष दिले पाहिजे आम्ही सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आहोत त्यामुळे शासनाकडून ही सातत्याने मदतीचा हात पुढे असणार आहेच असेही आमदार गाढवे म्हणाले