| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १५ जुलै २०२४
दि १३/७/२०२४ रोजी हिराबाग येथील ८००डी आय जॉईंट मध्ये मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने दि. १३ /७/२०२४ रोजी पासून सांगली मधील गावभाग , हरिपूर रोड, हनुमान नगर, कोल्हापूर रोड, भरतनगर, गणेश नगर, सिव्हिल हॉस्पिटल परिसर, खणभाग, पेठभाग, उत्तर शिवाजी नगर, वखरभाग, कर्नाळ रोड याठिकाणी पाणी पुरेसा पुरवठा झाला नव्हता.
अति. आयुक्त रविकांत अडसूळ यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन समक्ष पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत, सदर दुरुस्तीचे कामकाज आज ही युद्धपातळीवर करण्यात येत आहे, तथापि तांत्रिक अडचण उद्भवल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली होती.
सदरची तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे, मंगळवार दि. १६/७/२०२४ रोजी पाणी पुरवठा नियमित होणार आहे.
दरम्यान आवश्यकते नुसार टँकर व्दारे पाणी पुरवठा केला जाणार आहे.
संपर्क साठी नंबर
मनराज साळुंखे -- 9284551096
समीर फकीर -- 9309174661
(पाईप इन्स्पेक्टर) हे आहेत ,
तरी नागरिकांनी उपलब्ध पिण्याचे पाणी काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता श्री चिदानंद कुरणे यांनी केले आहे.