yuva MAharashtra सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करावे

सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करावे



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जुलै २०२४
जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी 30 जून 2024 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र (ई.आर-1) तात्काळ सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.
 सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करण्यास भाग पाडणे) अधिनियम 1959 नुसार रिक्तपदे कळविण्याबाबत व तिमाही विवरणपत्र ईआर-1 मध्ये मनुष्यबळाची माहिती सादर करणे बंधनकारक आहे. 


सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी त्यांच्याकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माहितीबाबतचे दि. 30 जून 2024 अखेरच्या तिमाहीचे विवरणपत्र ईआर-1 https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन सादर करावे. अधिक माहितीसाठी 0233-2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.