Sangli Samachar

The Janshakti News

गॅस सुरक्षतेच्या कारणावरून कुणी तुमच्या घरी आलं तरीम त्याच पावलाने त्याला परत पाठवा !



| सांगली समाचार वृत्त |
सांगली- दि. १२ जुलै २०२४
राज्य सरकार किंवा गॅस वितरण कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षतेसाठी कोणतीही योजना आखली नसताना, बेरोजगार मुलांना हाताशी धरीत ग्राहकांना लुटण्याचा गोरख धंदा सध्या सांगली शहरात सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

काही ठेकेदारांची टीम बेरोजगार मुलांना हाताशी धरून, मुलांना गॅस ग्राहकांच्या घरी पाठवते. त्यांच्या गळ्यात कंपनीचे ओळखपत्र व हातात पावती बुक असते. ही मुले तुमच्या घरातील गॅस सिलेंडर शेगडीची तपासणी बंधनकारक असल्याचे सांगत शुल्क योजनेच्या माध्यमातून दीडशे रुपये ग्राहकांच्या माथी मारत आहेत. एखाद्या सूज्ञ गॅस ग्राहकाने याला अटकाव केला तर तुमचे गॅस कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवत आहेत. त्यामुळे गॅस ग्राहक विशेषतः काही महिला याला बळी पडलेले आहेत.

परंतु अशा स्वरूपाचे कोणतेही योजना राज्य शासनाकडून किंवा गॅस वितरण कंपनीकडून सुरू करण्यात आली नसल्याची माहिती, माहिती अधिकार कायद्या अंतर्गत अर्जातून समोर आली आहे. त्यामुळे तुमच्याकडे गॅस कंपनीकडून अशी कोणी व्यक्ती आली तर त्याला त्याच पावली परत पाठवायचे आवाहन करण्यात आले आहे.