yuva MAharashtra 'पुत्री व्हावी ऐसा गुंडा, श्रेया ठक्करने गाढला तिन्ही लोका झेंडा !'

'पुत्री व्हावी ऐसा गुंडा, श्रेया ठक्करने गाढला तिन्ही लोका झेंडा !'


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ जुलै २०२४
'पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोका झेंडा' अशी आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे
'पुत्री व्हावी ऐसा गुंडा जिचा तिन्ही लोका झेंडा' अशी नवी म्हण तयार करावी लागणार आहे... कारण अनेक क्षेत्रात मुलींनी घेतलेली गगन भरारी कौतुकास्पद ठरत आहे. सध्या असे कुठलेही क्षेत्र नाही, ज्यामध्ये मुली, मुलांपेक्षा कमी आहेत. 

'सीए उत्तीर्ण होणे' हे अनेक तरुण तरुणींचे स्वप्न असते. परंतु याचा अभ्यासक्रम आणि उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या पाहिली की हे स्वप्न खरोखर किती अवघड आहे हे लक्षात येते. सीए होण्यासाठी निघालेल्या अनेकांची गाडी, पहिल्याच स्टेशनात रुळावरून घसरते. ती पुन्हा रुळावर येण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. हे पाहता अनेकजण यातून माघारही घेतात. पण काही जिद्दी तरुण-तरुणी ही अवघड परीक्षा उत्तीर्ण होऊन सीए झाल्याचे उदाहरणे ही कमी नाहीत.

मे महिन्यात पार पडलेल्या सनदी लेखापाल अर्थात सीए परीक्षेत सांगलीच्या मुला मुलींनी एक नवा इतिहास घडविला आहे. जिल्ह्यात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 29 विद्यार्थ्यांनी सीए परीक्षेत यशाचा झेंडा गाढला आहे. आणि विशेष म्हणजे पहिल्या 10 मध्ये येण्याचा विक्रम श्रेया ठक्कर हिने आपल्या नावावर केला आहे.


या परीक्षेत पहिला ग्रुप मधून 66 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी 20 जणांनाच उत्तीर्णचे प्रमाणपत्र प्राप्त करता आले तर दुसऱ्या ग्रुप मधून परीक्षा दिलेल्या 37 पैकी 18 विद्यार्थी यशस्वी झाले. दोन्ही ग्रुप मधून परीक्षेला बसलेल्या 42 विद्यार्थ्यापैकी पहिल्या ग्रुप मधून चार तर दुसऱ्या ग्रुप मधून दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेषतः श्रेया ठक्कर हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्याने पुढील प्रमाणे. रितेश गगराणी, संकेत पवार, रुची चौधरी, ओनिल शहा, लुसिका मेहता, रोहिणी शिंदे, प्राजक्ता पाटील, श्रेया ठक्कर, वीरश्री काणे, श्रुती विभुते, प्रसाद जोशी, श्रेयस पाटील, यशराज आवटे, आदित्य लोखंडे, शर्वरी किर्लोस्कर, जिगर वासानी, ऋतुराज लकडे, रत्नदीप पाटील, वैभव माने, दीपक पाटील, निखिल बदनीकाई, तेजस्विनी सावळे, सलोनी दानोळे, श्रेया जाखोटिया, जयदीप पाटील, सुशांत दौंडे, वल्लभ चव्हाण, अनुज पाटील, सूरज हुलवान.

वरील सर्व विद्यार्थ्यांचे सांगली समाचार न्यूज पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन !