Sangli Samachar

The Janshakti News

हरिपूर मधील निळकंठ नगर येथे दोन घरी फोडून सव्वा पाच लाखांचा ऐवजी लंपास !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ जुलै २०२४
बंद घराचे कुलूप तोडून आतील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. दि. 29 जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मिरज तालुक्यातील हरिपूर येथील निळकंठ नगर मध्ये दोन ठिकाणी हा घरफोडीचा प्रकार घडला. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कवठेमंकाळ येथील महावितरण विभागात कार्यरत असणारे राहुल गणपतराव जाधव हे हरिपूर येथील निळकंठ नगर येथे राहतात दि. २९ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास ते कुटुंबासह घरास कुलूप लावून फिरण्यासाठी कोल्हापूर आणि आंबाघाट परिसरात गेले होते. मध्यरात्री चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले 2 लाख 92 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने रोख 13000 आणि 1000 रुपये किमतीचा मोबाईल असा तीन लाख सहा हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला. हा प्रकार दिनांक 30 रोजी फिर्यादी राहुल जाधव हे परत आल्यानंतर उघड आला.


दुसऱ्या एका घटनेत निळकंठ नगर येथून जवळच असणाऱ्या विनायक नगर येथे डॉ. बाळकृष्ण वासुदेव चैतन्य हे राहतात. दिनांक 29 रोजी दुपारी एकच्या सुमारास पत्नीसह बाहेरगावी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास सुमारास डॉ. चैतन्य यांचे घर देखील चोरट्यांनी फोडले. घरातील एक लाख 92 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच 25000 असा ऐवज लंपास केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास डॉ. चैतन्य परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्याने ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे . पोलिसांनी या दोन्ही घटनांतील अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.