| सांगली समाचार वृत्त |
गंगटोक - दि. ३० जुलै २०२४
ठराविक रकमेच्या वर तुम्ही कमाई केली की त्यातील हिस्सा राज्य व केंद्र सरकारला धावाच लागतो नियम. परंतु याच भारतात एक असे राज्य आहे ज्या ठिकाणी तुम्ही हजारो नवे लाखो करोड रुपये कमविणे तरी तुम्हाला टॅक्स द्यावा लागत नाही. विश्वास नाही बसत ? पण ते खरे आहे. सिक्कीम हे भारतातील एक असे राज्य आहे जिथे एका विशिष्ट कायद्याअंतर्गत काय करातून सूट दिली जाते.
पण सिक्कीमच्या लोकांना इतकी मोठी सवलत का दिली जाते ? हे वर्तमानातील सत्य जाणून घेण्यासाठी सिक्कीमच्या इतिहासात धोखावे लागेल. 1975 पर्यंत सिक्कीम स्वतंत्र देश होता. भारतात विलीन होण्यासाठी सिक्कीमच्या राजाने एक अट ठेवली होती, ज्या अंतर्गत राज्यासाठी काही विशेष हक्कांचे मागणी केली, जी तत्कालीन केंद्र सरकारने मान्य केली. त्यानुसार सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना आयकर कायद्याच्या 1961 च्या कलम 10 (26एएए) अंतर्गत ही सूट देण्यात येत आहे.
घटनेच्या कलम 371 एफ अंतर्गत सिक्कीमला विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे त्यानुसार या आयकर कलमाच्या अंतर्गत ही तरतूद सिक्कीमच्या कोणत्याही स्थानिक आयोजनाचे उत्पन्न करमुक्त मानले जाते. आता ही बातमी वाचून कोणी सिक्कीम मध्ये राहायला जाण्याची कल्पना करत असेल तर थांबा. कारण ही सवलत फक्त तेथील मूळ रहिवाशांसाठीच लागू आहे.