| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ जुलै २०२४
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कडकपक्ष कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करीत महाआघाडीशी गद्दारी करणाऱ्या आमदारांसाठी आम्ही ट्रॅप लावला होता, यामध्ये काही बदमाश लोक सापडले आहेत त्यांची नावे आम्ही हायकमांडला कळविली आहेत. लवकरच त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल.
महाविकास आघाडीकडे मतांचा पूर्ण कोटा असताना शरद पवार गटाच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये काँग्रेसची मते फुटल्याच्या घटना समोर आले आहेत, या पार्श्वभूमीवर पत्रकाराने नाना पटोले यांना छेडले असता, त्यांनी मते फुटल्याचे मान्य करीत पक्ष कारवाईचे संकेत दिले. महाविकास आघाडी कळेल मतांचा कोटा पाहता प्रत्येक पक्षाने एक असे एकूण तीनच उमेदवार दिले होते. परंतु गद्दारांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, ही बाब आपण हाय कमांडच्या लक्षात आणून देणार आहोत. असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.