Sangli Samachar

The Janshakti News

महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी पृथ्वीराज बाबा पाटील धावले त्यांच्या कार्यकर्त्यासह !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ जुलै २०२४
अहोरात्र कोसळणाऱ्या पावसाने कृष्णा नदी पात्रातून बाहेर पडल्या पडल्या पृथ्वीराज बाबांच्या फौंडेशनचे कार्यकर्ते व ६ टेंपो कृष्णामाईच्या पुराच्या पाण्याने प्रवेश केलेल्या सुर्यवंशी व इनामदार प्लाॅट, जामवाडी, मगरमच्छ व पटवर्धन काॅलनी आणि कर्नाळ रोड परिसरात पृथ्वीराजबाबा यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाल्या. पृथ्वीराजबाबा आणि विरेंद्र पृथ्वीराज पाटील यांनी काल व आज या पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या घरी जाऊन संवाद साधला.

महापुरात सांगलीकरांना पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या माध्यमातून मदत केली आहे. याही वर्षी सलग आठ दहा दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे महापूराची शक्यता नाकारता येत नाही. आता ज्या ठिकाणी पुराच्या पाण्याचा प्रवेश झाला आहे. त्या भागातील लोकांना भिण्याचे कारण नाही. जिल्हा प्रशासन, काँग्रेस माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची भक्कम फळी, पृथ्वीराज पाटील फौंडेशन, सांगलीतील अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना यावेळी जोरदारपणे पूरग्रस्तांच्या मदतीला तातडीने धावून आल्याचे दिसून आले आहे .  

पृथ्वीराज पाटील फौंडेशनने आपत्कालीन कालात खालील हेल्पलाईनवर संपर्क करा.. आम्ही आपल्या सेवेस तत्पर आहोत. असे आवाहन केले आहे 
मो. नं. ९८२२८८२८६१,, ९६५७९६२३०१ व ९५८८४१३१०० असे आवाहन फौंडेशनने केले आहे. 


आज पृथ्वीराज पाटील फौंडेशनकडून ६ टेंपो मधून पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या प्रापंचिक वस्तू, भांडी, कपडे व अन्य साहित्य भरुन महापालिकेच्या निवारा केंद्रात सुरक्षितपणे नागरिकांसह पोहोचवण्याचे काम केले आहे. 

पृथ्वीराज पाटील फौंडेशनची ही माणुसकी पाहून पूरग्रस्तांचे डोळे पाणावले आणि पृथ्वीराज पाटील हा सांगलीकरांचा खरा लाडका भाऊ अशा उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या 

पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्या या कार्यात स्वतः पृथ्वीराजबाबा, पुत्र विरेंद्र,फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन कदम, उपाध्यक्ष सनी धोतरे,विशाल हिप्परकर,प्रमोद सुर्यवंशी, प्रशांत अहिवळे, आशिष चौधरी, शितल सदलगे, योगेश राणे, आरबाज शेख, आयुब निशाणदार, प्रशांत देशमुख, अजय देशमुख व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.