yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात आतापर्यंत १,१९,६८१ लाडक्या बहिणींची नोंदणी : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती !

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत १,१९,६८१ लाडक्या बहिणींची नोंदणी : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ जुलै २०२४
राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत १,१९,६८१ महिलांनी नोंदणी केली असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पत्रकार बैठकीत दिली. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये ५८,६७९ महिलांनी ऑनलाईन तर ६७ हजार २ महिलांनी ऑफलाइन नोंदणी केली. सध्या प्राप्त अर्जाची छाननी सुरू असल्याचे डॉ. दयानिधी यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना डॉ. दयानिधी म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाहीत. यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. योजनेच्या अंमलबजावण्यासाठी जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. योजनेच्या लाभाकरिता अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे.

शासनाने याबाबत नवा अध्यादेश जारी केला असून ही योजना अधिक प्रभावी राबविण्यासाठी महिलांना या योजनेचा अर्ज 'नारीशक्ती दूत' या ॲपवरून हे भरता येणार असल्याचे सांगून डॉ. दयानिधी म्हणाले की, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका मदत करतील.