| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३१ जुलै २०२४
स्मशानभूमीसाठी आरक्षित जागेकरिता महापालिकेच्या तिजोरीतून पैसे खर्च करू नयेत, अशी मागणी करणारे निवेदन माजी नगरसेविका, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री ॲड. स्वाती शिंदे यांनी ख्रिस्ती आणि मुसलमान समाज या नागरिकास समवेत महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना दिले आहे.
यावेळी बोलताना ॲड. स्वाती शिंदे म्हणाल्या की दोन्ही समाजाची जागा भूसंपादन करण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने नुकतीच अधिसूचना काढलेले आहे तरी त्याचा मोबदला म्हणून महापालिकेने आपल्या तिजोरीतून पैसे खर्च करू नयेत. कारण मुसलमान आणि त्रिस्ती दफन भूमीसाठी आरक्षित असलेली जागा मूळ जागा मालकांनी अवैद्यरित्या प्लॉट पाडून गुंठेवारीने विक्री केलेली आहे. ही संपूर्ण जागा पुरपट्ट्यातील आहे.
या जागेत भराव घालण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करावे लागणार आहेत. इतकी करूनही ही दलदलीतील असल्याने या ठिकाणी दफनभूमी करणे म्हणजे मृतदेहाचे विटंबना करण्यासारखे आहे, असे सांगून ॲड. शिंदे म्हणाले की या जागेतील 40 प्लॉट धारकाने गुंठेवारी नियमितीकरण करण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे. शिवाय येथील जागेचा भाव १.२५ कोटी रुपये असताना महापालिका मात्र एकरी चार कोटी रुपये प्रमाणे शुल्क देत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार करून या सर्व प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याचे मागणी ॲड. स्वाती शिंदे यांनी केले आहे.