yuva MAharashtra नाना पटोले यांचा आमच्यावरील आरोप गैरसमजातून, अजय नष्टे यांचा खुलासा !

नाना पटोले यांचा आमच्यावरील आरोप गैरसमजातून, अजय नष्टे यांचा खुलासा !


| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. २१ जुलै २०२४
पूजा खेडकर प्रकरणावरून पीएससीने गुन्हा दाखल केल्याने देशभरात खळबळ माजली असतानाच, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी एमपीएससीची ही अशीच फसवणूक झाल्याचा आरोप केल्याने महाराष्ट्रात नव्याने संशय कल्लोळ माजला. परंतु महाराष्ट्र शासन अथवा एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी खुलासा करण्यापूर्वीच जत येथील उपविभागीय आयुक्त अजय कल्याण नष्टे यांनी याबाबत आपली बाजू मांडली आहे. 


याबाबत अजय नष्टे म्हणाले की, मी अथवा माझी बहीण माधुरी कल्याण नष्टे यांनी कोणतेही खोटे दिव्यांग प्रशस्तीपत्र जोडलेले नाही, आम्ही दोघेही चांगल्या उत्तीर्ण झालेलो आहोत. कुणीतरी खोडसाळपणे मा. नाना पटोले साहेब यांना खोटी माहिती पुरवली असल्याने त्यांनी हे आरोप केले असावेत. याबाबत होणाऱ्या चौकशीस आम्ही दोघेही बहीण भाऊ तयार असल्याचेही अजय नष्टे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. नाना पटोले यांनी हा गंभीर आरोप केल्याने एमपीएससीच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उमटले होते. या चौकशी दरम्यान सत्य बाहेर येईलच. मात्र तोपर्यंत एमपीएससीच्या आणि नष्टे बंधू-भगिनींच्या विश्वासावर नाहक दाग राहणार आहे.