yuva MAharashtra सर्वसामान्य वंचित, दुर्लक्षित समाज घटकांनी एकत्र येण्यात सर्वांचे कल्याण - जरांगे पाटील

सर्वसामान्य वंचित, दुर्लक्षित समाज घटकांनी एकत्र येण्यात सर्वांचे कल्याण - जरांगे पाटील


| सांगली समाचार वृत्त |
जालना - दि. १५ जुलै २०२४
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी दुर्लक्षित समाज घटकांना एकत्र येण्याची साद घातल्याने, महाराष्ट्र शासनाची डोकेदुखी वाढली आहे. मनोज जरांगे यांनी नुकतेच सर्वसामान्य वंचित, दुर्लक्षित समाज घटकांनी एकत्र येण्यात सर्वांचेच कल्याण असल्याचे सांगून निमंत्रणाची वाट पाहण्यापेक्षा आपण सर्वांनी स्वतःहून एकमेकांच्या जवळ आले पाहिजे असे आवाहन केले होते.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यावेळी आणि आता हे जरांगे पाटील यांनी आपणाला नेतृत्व करायचे नाही त्याची मला हौस नाही. मी केवळ मराठा सेवक म्हणून अखेर पर्यंत काम करेन, असे म्हटले आहे.


एकमेकांना मतदान करून आगामी काळात जात मोठी व्हायची असेल तर, येणाऱ्या निवडणुकीला आपण एकसंघपणे सामोरे जायला हवे असे जरांगे पाटील म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्या या भूमिकेनंतर आता आसूद्दीन ओवेसी, बच्चू कडू आणि प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.