yuva MAharashtra विठुरायाचा गजर करीत विक्रमी १७ लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल !

विठुरायाचा गजर करीत विक्रमी १७ लाखाहून अधिक भाविक पंढरीत दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. १८ जुलै २०२४
आषाढीच्या देवशयनी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरीत विक्रमी १७ ते १८ लाखाहून अधिक एक दाखल झालेले आहेत. बुधवारी एकादशीच्या निमित्ताने पहाटेपासूनच चंद्रभागा नदीच्या पवित्र स्नानासाठी रेल्वे कोणते विष्णुपंत बंधारा अशा विस्तीर्ण वाळवंटात लाखोंचा वैष्णवांचा जनसमुदाय लोटला आहे.

गोपाळपूर रोडवरील रिद्धी सिद्धी गणेश मंदिराजवळील दहा नंबर पत्राशेड पासून पदस्पर्श दर्शन रांग सुरू होती. सुमारे 32 ते 36 तास वारकरी भाविकांना दर्शन रांगेत उभारावे लागत होते. यामध्ये वृद्ध, महिला यांना त्रास सहन करावा लागल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून आली. दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंढरीत आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना राजकीय मंडळीकडून मोठ्या प्रमाणावर पाणी आणि अन्नदान केले जात होते. पंढरी नगरी, 65 एकर परिसर, सांगोला चौक, शेगाव दुमाला, भटुंबरे, इसबाबी इत्यादी ठिकाणी लाखो वारकरी भाव एक विसावलेले दिसत आहेत.


विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, स्टेशन रोड, नवी पेठ आधी भागात वारकरी भाविकांना लागणाऱ्या प्रासादिक वस्तू, तुळशीमाळा, देव देवतांचे फोटो, खेळणे आदींची दुकाने थाटण्यात आली आहेत. या ठिकाणासह कैकाडी महाराज मठ, तनपुरे महाराज मठ, तुळशी वृंदावन येथे भाविक दर्शन घेत आहेत.

आषाढी यात्रेसाठी यंदा प्रशासकीय यंत्रणा नवीन असली तरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा रेकॉर्ड ब्रेक वारकरी भाविकांची गर्दी असतानाही, भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा बाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान आषाढी एकादशीच्या निमित्ताने खा. प्रणिती ताई शिंदे यांनी पंढरपूरच्या विठू रखुमाई मंदिरात दर्शन घेतले. पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई समोर लीन होत, सोलापूर सह महाराष्ट्रातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस राज्य सुजलाम सुफलाम ठेव, उत्तम पाऊस पडू दे, अशी मागणी केली. खा. प्रणिती शिंदे यांच्याप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यासह राज्यभरातून भाविकांच्या सेवेत उपस्थिती लावण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा अधिक क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्वजण दक्ष आहेत.