Sangli Samachar

The Janshakti News

परीक्षेत कमी मार्क मिळण्याचे अजब मानसशास्त्र ! संशोधकांच्या दाव्यानं विद्यार्थ्यांचं फावणार !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जुलै २०२४
परीक्षेत कमी मार्क्स मिळण्यामागचं एक अजब मानसशास्त्र असल्याची बातमी व्हायरल झाली आहे. परंतु त्यामुळे विद्यार्थी-पालकात आणि शिक्षकांत नव्याने गोची निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया आणि डिकीन युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे नुकताच एक अभ्यास करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना परीक्षेत कमी मार्क मिळण्यामागे त्यांचा न झालेला अभ्यास किंवा त्यांची स्मरणशक्ती हे कारणीभूत नसून यामध्ये दुसरच एक कारण आहे.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या हॉलचं छत खूप उंच असतं तसेच जो हॉल खूप मोठा असतो त्या हॉलमध्ये बसून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षा पेक्षा खूप कमी गुण मिळतात असा अजब निष्कर्ष या संशोधकांनी काढलेला आहे. यासाठी 15000 हून अधिक विद्यार्थ्यांचा अभ्यास या संशोधकांनी वेगवेगळ्या विद्यापीठातून केला असल्याचं म्हटलं आहे.


यामध्ये लिंग, वय, शैक्षणिक पात्रता अशा विविध निष्कर्षातून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या मुलांना वेगवेगळ्या हॉलमध्ये बसवून परीक्षा घेतली असता असं लक्षात आलं की उंच छत असणाऱ्या मोठ्या हॉलमध्ये बसून परीक्षा देणाऱ्या मुलांना मन एकाग्र करायला अडचणी येतात. त्यांची एन्झायटी वाढणे हे त्यामागचे कारण असल्याचं म्हटलं आहे. 

आता तुमच्या मुलाला किंवा मुलीला मार्क कमी पडल्यानंतर त्यानं या बातमीतील संशोधन तुमच्यापुढे मांडलं तर तुम्ही काय कराल ? आहे की नाही ग्रहण प्रश्न ?