yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात एकाच वेळी पाचशे ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे जयंती साजरी करणार - कुलदीप देवकुळे

सांगली जिल्ह्यात एकाच वेळी पाचशे ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचे जयंती साजरी करणार - कुलदीप देवकुळे


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. ११ जुलै २०२४
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य वैश्विक आहे त्यांच्या कार्यकर्तुत्वाला शोभेल अशी सांगली जिल्ह्यात एकाच वेळी पाचशे ठिकाणी जयंती साजरी करणार असणल्याची माहिती सांगलीतील जेष्ठ साहित्यिक कुलदीप देवकुळे यांनी तासगाव येथे दिली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने तासगाव येथे नुकतीच जेष्ठ नेते प्रा. राम कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या समारंभात ते बोलत होते. 

यावेळी तासगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सुशांत माने यांची तर उपाध्यक्षपदी राकेश देवकुळे यांची त्याचप्रमाणे तासगाव शहर अध्यक्षपदी रोहित वासनिक यांची निवड करण्यात आली. 


या समारंभासाठी समितीचे उपाध्यक्ष प्रमोद रास्ते, प्रा .लक्ष्मण मोरे, प्रशांत सदामते, प्रशांत आवळे, अमित कांबळे, आबा सुवासे, आकाश लोंढे, प्रथमेश देवकुळे,, आकाश कांबळे विक्रम मोहिते यांच्यासह तासगाव तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष आकाश तिवडे (मेजर) यांनी उपस्थित यांचे आभार मानले.