Sangli Samachar

The Janshakti News

राहुल गांधींना वारीचे निमंत्रण देण्याचा अधिकार पवारांना कोणी दिला ? - तुषार भोसले



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३ जुलै २०२४
संसदेत देवतांची पोस्टर दाखवत हिंदूंवरून भाजपवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना घेणाऱ्या विविध धर्माच्या धर्मगुरूंनी अभ्यास करून वक्तव्य करण्याचा सल्ला दिला असतानाच आता या वादात आचार्य तुषार भोसले यांनीही उडी घेतली आहे. हिंदुंना हिंसक म्हणणाऱ्या आणि हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीना आषाढी वारीत येण्याचं निमंत्रण द्यायचा शरद पवारांना कोणी अधिकार दिला ? असे आचार्य तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

आपल्या अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका करताना तुषार भोसले यांनी पुढे म्हटले की, शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते. पण शरद पवारांचे त्यांच्या 84 वर्षांच्या आयुष्यात पाय कधी वारीकडे वळले नाहीत आणि ते कोणत्या तोंडाने राहुल गांधीला निमंत्रण देत आहेत? अशा सवालही तुषार भोसले यांनी केला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. शरद पवार हे 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत सहभागी होणार आहे. दरम्यान, शरद पवार 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार अशा चर्चांना मधल्याकाळात उधाण आले होते. मात्र यावर स्वत: शरद पवारांनी स्पष्टीकरण देत मी वारीत चालणार नसून केवळ पंढरपूरला जाणाऱ्या पालखीच्या स्वागतासाठी मी थांबणार असल्याचे सांगितले. वारी माझ्या गावावरून जाते त्यामुळे त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


तर दुसरीकडे याच मुद्याला घेऊन भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. कायम इप्तार पार्ट्या झोडणारे शरद पवार आणि राहुल गांधी यांना आजपर्यंत कधीच वारी आणि वारकरी दिसले नाहीत. मात्र, आता महाराष्ट्राच्या निवडणूका डोळ्यांसमोर ठे ऊन तुम्ही वारीत यायला बघताय, हे न कळायला महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही हे लक्षात ठेवा. अशा शब्दात तुषार भोसले यांनी टीका केली आहे.