yuva MAharashtra अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार घरोघरी पोहचावे, हेच त्यांना अभिवादन - श्रीमती नंदिनी आवाडे

अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार घरोघरी पोहचावे, हेच त्यांना अभिवादन - श्रीमती नंदिनी आवाडे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ जुलै २०२४
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे जागतिक पातळीवरील आहे. त्यांचे साहित्य आणि त्यांची समतेची चळवळ सर्वदूर पोहोचावी अण्णाभाऊंचे साहित्य आणि विचार घरोघरी पोहचवावे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. अशी भावना सांगली जिल्हा जातपडताळणी विभागाच्या अध्यक्षा मा. श्रीमती नंदिनी आवाडे यांनी व्यक्त केली. 

यावेळी, सांगली जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा. बाळासाहेब कामत, समाज कल्याण निरीक्षक मा. सचिन पिसाळ, समाज कल्याण निरीक्षक मा. राहुल जाधव, दलित मित्र मा. अशोक पवार, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मा. प्रा. राम कांबळे, मा. प्रा. लक्ष्मण मोरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि चंद्रकांत हंडोरे यांचे निकटवर्तीय मा. सिद्धार्थ माने, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा. पृथ्वीराज बाबा पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मा. प्रा. पद्माकर जगदाळे, भाजपाचे नेते मा. शेखर इनामदार, मा. पप्पू डोंगरे, ज्येष्ठ अभ्यासक-विचारवंत डॉ. नामदेव कस्तुरे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष जितेंद्र हेगडे, यांच्यासह पोलीस प्रशासन, सामाजिक, साहित्यिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी व अण्णा भाऊंच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने अभिवादन केले. 


स्वागत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष मा. आकाश तिवडे (मेजर) यांनी केले. शेवटी आभार साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे (लेखणीपुत्र) यांनी मानले.