| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ जुलै २०२४
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे नुकत्याच झालेल्या घटनेची पडसाद सांगली जिल्ह्यात उमटू नयेत, म्हणून पोलीस प्रशासन सज्ज असून, याबाबत समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही पोस्ट समाज माध्यमावर प्रसारित करू नये किंवा अफवा पसरवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी जनतेला केले आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना संदीप घुगे म्हणाले की, जनतेला आवाहन केले की, जर कोणास काही चुकीची अथवा बेकायदेशीर गोष्ट लक्षात आली, तर ती तात्काळ पोलीस यंत्रणाला कळवावी. जेणेकरून त्या विरोधात पोलिसाला कायदेशीर कारवाई करता येईल. आम्ही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेत आहोतच. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत फिक्स पॉईंट लावण्यात आलेले आहेत, पोलिसांकडून पेट्रोलिंगही सुरू आहे, आमची गोपनीय यंत्रणा आहे सतर्क आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही पोलिसांचे बारीक लक्ष आहे. जर समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केव्हा घटना निदर्शनास आली तर न्यायालयाच्या निर्देशनानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कोणतीही चुकीची गोष्ट घडू नये म्हणून समाजाने एकत्र येऊन हे काम करणे आहे असे आवाहनही संदीप घुगे यांनी केले आहे.