yuva MAharashtra शामरावनगरात पृथ्वीराज पाटील फौंडेशनने केले ९०० वह्यांचे वाटप !

शामरावनगरात पृथ्वीराज पाटील फौंडेशनने केले ९०० वह्यांचे वाटप !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ जुलै २०२४
म. जोतिबा आणि सावित्रीमाई फुले, छ. शाहू आणि डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी वंचितांना शिक्षणाची दारे खुली केली. सांगलीच्या शामरावनगरातील विविध शाळांमध्ये वंचितांची लेकरं शिकतात. त्यांना खूप शिकण्याची प्रेरणा मिळावी. बहुजनांच्या घरात शिक्षणामुळे समृद्धी यावी या प्रामाणिक भावनेतून पृथ्वीराज पाटील बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येत आहे .बाबांनी दिलेल्या वह्यांमध्ये सुंदर हस्ताक्षराने लेखन करा. खूप शिका व मोठे व्हा. आई बाबा, शाळा यांचे उपकार अविस्मरणीय आहेत. चांगला माणूस बना. असे प्रतिपादन प्रियांका ऋतुराज पाटील यांनी केले.

प्रारंभी मुख्याध्यापक केंगार यांनी स्वागत केले. प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी पाहुणे परिचय करून पृथ्वीराज पाटील व फौंडेशनच्या कार्याचा आढावा घेतला.


यावेळी रज्जाक नाईक म्हणाले, 'शामरावनगरा सारख्या घाम गाळून पोट भरणाऱ्या श्रमिक व वंचित पालकांच्या मुलांना वह्या देण्याचा हा उपक्रम पृथ्वीराज बाबांचा गरिबांबद्दल आस्था व प्रेम व्यक्त करणारा आहे. शंभर टक्के समाजकारण करणारा राजकारणातला आदर्श म्हणजे स्व. गुलाबराव आणि पृथ्वीराज पाटील यांचा उल्लेख अटळ आहे. शामरावनगर व परिसरातील सर्व पालकांच्या वतीने पृथ्वीराज यांना धन्यवाद. '

शामरावनगरातील प्रगती विद्यालय, अभिनव प्राथमिक व अभिनव माध्यमिक शाळा आणि महापालिका शाळा नं ११ या चारही शाळांमध्ये आज सुमारे ९०० वह्यांचे वाटप करण्यात आले. मनपा शाळेत मुख्याध्यापक गजानन मोरलवार यांनी सांगितले स्वागत व प्रास्ताविक केले. रज्जाक नाईक व ताजुद्दीन शेख यांनी बहुजन समाजातील लेकरांना सामर्थ्य देणाऱ्या पृथ्वीराज पाटील व फौंडेशनचे आभार मानले. 
यावेळी विधानसभा क्षेत्र अल्पसंख्याक अध्यक्ष ताजुद्दीन शेख, माजी नगरसेविका नसिमा व रज्जाक नाईक, गौतम निरंजन, उस्मान शेख, समीर शेख, मन्सूर नाईक, सचिन यादव, अख्तरभाई अत्तार, जब्बार हजारे, जबीह शेख, अख्तर बाणदार, चारही शाळांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विशेष म्हणजे पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.